मुंबई : लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नीरज व्होरा यांचं निधन
Continues below advertisement
'फिर हेरा फेरी' सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते नीरज व्होरा यांचं आज पहाटे चारच्या सुमारास निधन झालं. नीरज यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांच्या जुहूमधील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नीरज व्होरा यांना गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर, त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण यावेळी ते कोमामध्ये गेल्याने, त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं होतं.
Continues below advertisement