VIDEO | सिने-नाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं निधन | मुंबई | एबीपी माझा

सिद्ध मराठी सिने-नाट्य कलाकार दिनेश साळवी याचं आकस्मिक निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. काल (30 जानेवारी) मुंबईतील विले पार्ले स्टेशनला जाताना छातीत दुखू लागल्याने ते खाली बसले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी रात्री उशिरा त्यांना मृत घोषित केलं, त्यामुळे आज त्यांच्या निधनाची बातमी पसरली आहे. सीआयडीसह अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेल्या दिनेश साळवी यांच्या आकस्मिक निधनाने सिने आणि नाट्यसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ते अभिनेता आदेश बांदेकर यांचे अतिशय जवळचे मित्र होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola