मुंबई : दहा रुपयांची सर्व नाणी अधिकृत : आरबीआय
Continues below advertisement
दहा रुपयांच्या सर्व नाण्यांबाबत रिझर्व्ह बँकेने मोठी घोषणा केली आहे. काही व्यापारी 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेकडे आल्या होत्या. त्यानंतर 10 रुपयांची 14 डिझाईनची सर्व नाणी वैध असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
Continues below advertisement