मुंबई : पल्लवी पूरकायस्थच्या फरार मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Continues below advertisement

मुंबईतील वकील तरुणी पल्लवी पूरकायस्थच्या हत्या प्रकरणातील फरार मारेकरीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबई क्राईम ब्रँचने श्रीनगरमध्ये कारवाई करुन दोषी सज्जाद मुगलला बेड्या ठोकल्या. जवळपास गेल्या दीड वर्षांपासून सज्जाद फरार होता.

पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांचं अभिनंदन केलं. नाशिकच्या जेलमध्ये असताना फेब्रुवारी 2016 मध्ये सज्जादला पॅरोल मिळाला होता. आईच्या आजारपणाचं कारण पुढे करुन सज्जादने पॅरोल मिळवला.

स्थानिक पोलिस स्टेशनला हजेरी लावण्याची अट त्याला घालण्यात आली होती. त्याचा पॅरोल मार्चमध्ये संपणार होता, मात्र त्याने तो वाढवून घेतला. त्यानंतर सज्जाद परागंदा झाला. मेमध्येही तो परत न आल्याने पोलिसांनी तक्रार दाखल केली.

काश्मिरातील पाकिस्तानच्या सीमेजवळ उरीमध्ये सज्जादचं गाव आहे. वर्षभरापासून पोलिस सज्जादचा शोध घेत होते. अखेर जम्मू काश्मिर पोलिसांच्या सहकार्याने मंगळवारी श्रीनगर-लेह हायवेवर पोलिसांनी मुगलला अटक केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram