खड्ड्यांचे अड्डे : मुंबईतील व्हीआयपी परिसरातील रस्त्यांवर खड्डे कसे पडत नाहीत?
Continues below advertisement
सामान्य माणूस जेव्हा आमदार, खासदार आणि मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसतो तेव्हा त्यांचं आयुष्य बदलून जातं.. त्यांच्याकडे गाडी, बंगल्यासह एेषोआरामाच्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतात. खरंतर सर्वसामान्य मतदारांच्या जीवावरच नेतेमंडळी हा सर्व पल्ला गाठतात. असं असतानाही राज्यकर्ते आणि सर्वसामान्यांमध्ये फरक का केला जातो? मुंबईतील आमदार, मंत्री आणि महापौरांच्या बंगल्याबाहेरचे चकचकीत रस्ते बघितल्यावर हा फरक अधोरेखीत होतो. सर्वसामान्य मुंबईकरांचा खड्ड्यातून जीवघेणा प्रवास सरु असताना दुसरीकडे मंत्रीमहोदय, महापौरांचा प्रवास मात्र सुसाट सुरु आहे.
Continues below advertisement