मुंबई : रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईचा दूध पुरवठा रोखला जाणार : राजू शेट्टी

ऱविवारी मध्यरात्रीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुंबईचा दूध पुरवठा रोखला जाणार आहे. दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनंही तशी मदत करावी. अन्यथा 16 जुलैपासून दूध संकलन बंद आंदोलन व्यापक आणि तीव्र केलं जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. तसंच पोलिसांनी बळाचा वापर करुन शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याच प्रयत्न केला तर सहन करणार नाही, असंही शेट्टी म्हणालेत. दरम्यान, स्वाभिमानीच्या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola