स्पेशल रिपोर्ट : मुंबई : पीएनबीच्या ब्रिच कँडी ब्रांचमध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड
Continues below advertisement
पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 11 हजार 360 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर येतंय. पीएनबीच्या मुंबईतील ब्रिच कँडी ब्रांचमध्ये हा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय. यासंदर्भात पंजाब नॅशनल बँकेनं मुंबई स्टॉक एक्सचेंजला पत्र लिहिलं आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या काही अकांऊटसद्वारे गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. काही खातेदारांच्या संगनमतानं हे व्यवहार झाल्याचं दिसतं आहे. इतर बॅंकांकडूनही या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये परदेशात पैसा पाठवला. बॅंकेनी हा प्रकार उघड होताच याची रितसर तक्रार कऱण्यात आल्याचीह बॅंकेनी माहिती दिली आहे. त्यानंतर पीएनबीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण व्हायला सुरुवात झाली.
Continues below advertisement