मुंबई : मुंबईतील धोकादायक पुलांवर 'माझा'चा रिअॅलिटी चेक
Continues below advertisement
अंधेरी दुर्घटनेनंतर मुंबईसह ठाण्यातील धोकादायक पादचारी पुलांचा प्रश्न एेरणीवर आला आहे. लोअर परळच्या पुलाबरोबरच मुंबईतले आणखी 5 पूल धोकादायक आहेत. त्यामुळे हे पूल सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागू शकतो. दादर टिळक पूल, एल्फिन्स्टन पूल, करीरोड पूल, महालक्ष्मी पूल आणि बेलासीस पूल हे 5 पूल धोकादायक आहेत. या पुलांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्यावतीनं मागील दोन वर्षांपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पाठपुरावा सुरु आहे. या पुलांच्या बाबतीत लवकरात लवकर पावलं उचलली गेली नाही तर मुंबईकरांची भविष्यात मोठीच कोंडी होण्याची शक्यता आहे...
Continues below advertisement