मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सह्याद्री अतिथीगृहावरील इफ्तार पार्टी वादात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम मंचाची इफ्तार पार्टी वादात सापडली आहे....थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर इफ्तार पार्टीला सुरुवात होणार आहे...सह्याद्री अतिथीगृहाची वास्तू सरकारची आहे, ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खासगी कार्यक्रमासाठी का द्यायची? असा सवाल विरोधकांनी केलाय.
शिवाय सरकारच्या परिपत्रकानुसार सह्याद्री अतिथीगृहावर केवळ शासकीय बैठका, कार्यशाळा आणि पत्रकार परिषदाच आयोजित होऊ शकतात. मग हे सरळ सरळ नियम, कायद्याचं उल्लंघन नाही का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय...