Free Calling | मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेत ग्राहकांची चांदी, 'या' कंपन्यांकडून फ्री कॉलिंगची घोषणा | ABP Majha
Continues below advertisement
रिलायन्स जिओने इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी इंटरकनेक्ट युसेज चार्ज(IUC) लागू केला आहे. बुधवारी कंपनीने त्याबाबतची घोषणा केली. त्यामुळे जिओ युजर्सना धक्का बसला. कालपासून सर्वत्र रिलायन्स जिओला ट्रोल केले जाऊ लागले आहे. त्यानंतर आज वोडाफोन आयडिया लिमिटेड Vodafone Idea Limited (VIL) ने आययूसीसंदर्भात (IUC) मोठी घोषणा केली आहे. वोडाफोन आयडियाकडून सांगण्यात आले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांकडून इतर कॉल्सच्या बदल्यात अतिरिक्त पैसे आकारणार नाही. वोडाफोन-आयडियाकडून वेगळे आययूसी चार्जेस आकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या फ्री ऑऊटगोईंग सुविधेचा आनंद घ्या.
Continues below advertisement