मुंबई : शिवसेना-भाजपमधील दरी कमी होत आहे का?

Continues below advertisement
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधली दरी कमी होत असल्याचे संकेत आज भाजपच्य महामेळाव्यात दिसले. कारण एरव्ही शिवसेनेवर तुटून पडणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी आज शिवसेनेशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री, आणि चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचं गुणगान गायलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपत फुट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी-काँग्रेसला एक प्रकारे हा अप्रत्यक्ष इशारा होता. पक्षाच्या 38 व्या स्थापनादिनानिमित्त हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या शक्तिप्रदर्शनाला कॅबिनेट मंत्री आणि राज्यभरातून आलेले लाखो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram