मुंबई : जे. डे हत्या प्रकरण, छोटा राजनने जे. डेंना नेमकं का संपवलं?

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह सर्व 9 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला.

छोटा राजन, सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगरवाल आणि दीपक सिसोडीया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले आहेत. या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

पुरावे आणि साक्षीनुसार छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होता.

जे डे हत्या प्रकरणी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा फरार आहे. उर्वरित 11 जणांपैकी जोसेफ पॉलसन आणि जिग्ना वोरा या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण सिद्ध झाल्यास छोटा राजनला फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते, पण ती शक्यता कमी होती. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola