मुंबई : सुरक्षेसाठी लावलेली टोकदार खिळ्यांची जाळी HDFC बँकेने काढली
मुंबईतील एचडीएफसी बँकच्या फोर्ट शाखेबाहेर बसवलेली टोकदार खिळ्यांची जाळी काढून टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर बँकेला जाग आली आहे. खरंतर रात्रीच्या वेळी बँके बाहेर कुणी झोपू नये किंवा बसू नये यासाठी ही जाळी लावण्यात आली होती. मात्र ही अणकुचीदार टोक असणारी जाळी अत्यंत धोकादायक असल्यामुळे ती काढून टाकण्याची मागणी केली जात होती. अखेर एचडीएफसी बँकेच्या ट्वीटर हँडलवरून अधिकृतपणे माहिती देऊन जाळी काढून टाकण्यात येत आहे.