खेळ माझा : महान टेनिसवीर आणि फेडररचे गुरुजी स्टीफन एडबर्गचा 'एबीपी माझा'शी संवाद
Continues below advertisement
स्टीफन एडबर्ग... टेनिसच्या खेळातल्या सर्व्ह अँड व्हॉली स्टाईलचा एका जमान्याचा बादशाह. स्वीडनच्या या टेनिसवीरानं १९८५ ते १९९२ या सात वर्षांच्या कालावधीत पुरुष एकेरीची सहा ग्रँड स्लॅम विजेतीपदं पटकावली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या स्पोर्टस अॅवॉर्डसच्या निमित्तानं एडबर्ग सध्या मुंबईत आहे. एबीपी माझानं हीच संधी साधून स्टीफन एडबर्गशी संवाद साधला आणि त्याच्याकडून बियाँ बोर्ग ते रॉजर फेडरर असा टेनिसचा इतिहासच जाणून घेतला. पाहूयात एडबर्ग काय म्हणालाय?
Continues below advertisement