मुंबई : आयपीएल बेटिंगप्रकरणी अरबाज खान माफीचा साक्षीदार, बडे मासे गळाला लागणार : प्रदीप शर्मा

Continues below advertisement
बॉलिवूड सुपस्टार सलमान खाननंतर त्याचा धाकटा भाऊही कायद्याच्या कचाट्यात अडकला. अभिनेता अरबाज खानने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली दिली आहे. खान कुटुंबाला अरबाजच्या सवयीचा प्रचंड तिटकारा असल्याचीही माहिती आहे.

गेल्या पाच वर्षांपासून अरबाज बुकी सोनू जलानच्या संपर्कात होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अरबाजने दिली. मात्र आपल्या कुटुंबाला सट्टा लावणं पसंत नसल्याचंही अरबाज म्हणाला.

आपण बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुकी सोनू जलानने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल केलं, दबाव आणला, असा दावा अरबाजने केला आहे.

अरबाजवर दबाव आणून त्याचे पैसे सोनूने गुंतवल्यामुळे अरबाज थेट आरोपी होत नाही, त्यामुळे अरबाजला बेटिंग प्रकरणात पोलिसांनी मुख्य साक्षीदार केलं.
पोलीस उपायुक्त प्रदीप शर्मा यांनी या प्रकरणात आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram