अंधेरी पूल दुर्घटना : तब्बल 12 तासांनंतरही मुंबईची लाईफलाईन विस्कळीत
आज पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा आजचा प्रवास सुरु होण्याआधीच थांबला... अंधेरी स्टेशनवरुन पार्ल्याला जोडणारा गोखले पादचारी पुलाचा भाग आज सकाळी साडेसातच्या दरम्यान कोसळला. ज्यात 5 जण जखमी झाले आहेत.. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रेल्वेनं दिलीय. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही लोकल ही पुलाखाली नव्हती, अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं असतं.. याआधी 29 सप्टेबर 2017 ला एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेतही 23 जणांना जीव गमवावा लागला होता.
यानंतर मुंबईतील फूट ओव्हर ब्रीज, जिने आणि इतर सुविधा अद्ययावत करण्यावर भर देऊ असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं होतं. मात्र बोलबच्चनगिरीशिवाय मुंबईकरांच्या हाताला काहीही लागलेलं नाही.
यानंतर मुंबईतील फूट ओव्हर ब्रीज, जिने आणि इतर सुविधा अद्ययावत करण्यावर भर देऊ असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं होतं. मात्र बोलबच्चनगिरीशिवाय मुंबईकरांच्या हाताला काहीही लागलेलं नाही.