मुंबई : खड्डेच खड्डे चहूकडे, गेले रस्ते कोणीकडे ?

Continues below advertisement
((मायानगरी मुंबई एक असं शहर जे कधीही झोपत नाही. असं म्हणतात. पण, सध्या)) मुंबईत पाऊस असा काही बरसतोय की मुंबईकरांची झोप खऱ्या अर्थाने त्याने उडवलीय, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. त्यात मुंबईत पाणी तुंबणं, ट्रेन बंद पडणं, रस्ते वाहतूक विस्कळीत होणं, हे आता झालं नाही तरच नवल. मुंबईत ऐन पावसाळ्यात रस्ते नावाची संकल्पना अस्तित्त्वातच नसते. उरतात ते फक्त खड्डे. म्हणजे खड्ड्यांमध्ये थोडे थोडे रस्ते शोधत चालणारे आणि वाहन चालवणारे मुंबईकर यातून कसाबसा मार्ग काढतात. सालाबाद प्रमाणे याही वर्षीच्या पावसाने मुंबईच्या रस्त्यांची आणि मुंबई महापालिकेच्या कारभाराची वस्त्रं उतरवलीत. त्याचीच ही बोलकी दृश्य. दादर, प्रभादेवी आणि घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड. बदललंय फक्त नाव, खड्डे मात्र तेच आहेत..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram