गोरेगावच्या आरे कॉलनीत आग | मुंबई | एबीपी माझा
गोरेगावच्या आरे कॉलनीत संध्याकाळच्या सुमारास भडकलेली आग अजूनही धुमसतेय..ही आग इतकी भीषण आहे की अग्निशमनचे 100 कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आलेत. या आगीचा भडका आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमध्येही शिरण्याचा धोका संभावतोय. दरम्यान याच ठिकाणी मेट्रो आणि इतर प्रकल्पांची विकासकामं सुरू असल्यानं ही आग लागली की लावली याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी आरे बचाओ चळवळीनं केलाय.