मुंबई : 16 वर्षीय बॉल बॉयकडून विराटचा अप्रतिम झेल, आयुष झिमरेशी बातचीत
भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या वानखेडेवरच्या वन डे सामन्यात एका बॉलबॉयनं क्रिकेटरसिक आणि जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात विराट कोहलीने ठोकलेला एक षटकार डीप फाईनलेगच्या सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या एका बॉलबॉयने टिपला. त्या बॉलबॉयचं नाव आयुष झिमरे. तो मुंबईचा सोळा वर्षांखालील वयोगटाचा क्रिकेटर आहे.