मुंबई : नववीतल्या मुलीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

Continues below advertisement
मुंबईत एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेजमध्ये काल संध्याकाळी पाच वाजता ही धक्कादायक घटना घडली. ती राहत असलेल्या घराच्या शेजारील इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन तिने उडी मारली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून मुलीला वाचवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केल्याचंही त्यात दिसत आहे. अनेक जण तिला उडी न मारण्याचं आवाहनही करत होते. परंतु मुलीने कोणाचंही न ऐकता उडी मारली.
या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. तिने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. समतानगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram