मुंबई : मुलुंडमध्ये आजपासून 98 व्या नाट्यसंमेलनाला सुरुवात
Continues below advertisement
98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला आजपासून मुलुंडमध्ये सुरुवात होतेय... ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलाकार कीर्ती शिलेदार या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा आहेत. या नाट्यसंमेलनाला नाट्य कलाकार आणि रसिकांसह राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. मुलुंड पश्चिमेला असणाऱ्या कालिदास नाट्यगृहात आजपासून तीन दिवस हे नाट्यसंमेलन चालणार आहे... औपचारिकरित्या नाट्यसंमेलनाला दुपारी 4 वाजता नाट्य दिंडीने सुरुवात होईल... तर, नाट्यदिंडीने सुरू होणारा हा महाअंक 16 जूनच्या पहाटे चारपर्यंत सुरू राहणार आहे.
Continues below advertisement