मुंबई : बिर्ला केंद्रात मराठी रंगभूमीचं दर्शन घडवणारं दालन उभारणार : उद्धव ठाकरे
Continues below advertisement
98व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं सूप वाजलं आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, स्वागताध्यक्ष विनोद तावडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित होते. गिरगाव बिर्ला केंद्र इथे मराठी नाट्यसंमेलनाचं समृद्ध दर्शन घडवणारं दालन महापालिकेतर्फे उभारण्यात येईल, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. नाट्यसंमेलनाच्या मंचावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या संपर्क फॉर समर्थन अभियानाची खिल्ली उडवली. दरम्यान, यंदा प्रथमच सलग 60 तास नाट्यसंमेलन रंगलं. या नाट्यसंमेलनाला रसिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळाला.
Continues below advertisement