मुंबई : भायखळा जेलमधील 78 महिला कैद्यांना विषबाधा
मुंबईतील भायखळा जेलमध्ये 78 महिला कैद्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व महिला कैद्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी नाश्त्यानंतर काही महिला कैद्यांनी पोटदुखी, उलट्या होण्याच्या तक्रारी जेल प्रशासनाकडे केल्या. हळूहळू कैद्यांच्या तक्रारीत वाढ झाली. त्यानंतर जेल प्रशासनाने तात्काळ या कैद्यांना रुग्णालयात दाखल केलं. आत्तापर्यंत 78 कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कैद्यांना सकाळच्या नाश्त्यातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. याबाबत जेल प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. पण अद्याप याप्रकरणी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.