मुंबई : सहा वर्षांच्या चिमुरड्याला डॉक्टरकडून टॉर्चने मारहाण
Continues below advertisement
मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातल्या एका डॉक्टरकडून सहा वर्षांच्या चिमुरड्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुर्यांशू गुप्ता नावाच्या चिमुरड्याला अर्धांगवायूचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री 12 वाजता डोळे तपासण्यासाठी बोलावल्याचा राग काढत डॉ. गौरव याने सूर्यांशूच्या डोक्यात टॉर्च मारल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मारहाणीत सूर्यांशूच्या डोक्याला तीन टाकेदेखील पडले आहेत.
Continues below advertisement