Dongri Building Collapse | मुंबईतील डोंगरीमध्ये इमारतीचा अर्धा भाग कोसळला, 40 ते 50 जण अडकल्याची भीती | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईतील डोंगरी भागातील कौसर बाग नावाच्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत 40 ते 45 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु दाटीवाटीचा परिसर आणि चंचोळ्या गल्ल्या यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचं आव्हान अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिसांसमोर आहे. या दुर्घटनेनंतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram