मुंबई : डॉ. दीपक अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

Continues below advertisement

29 ऑगस्टच्या मुंबईच्या मुसळधार पावसात वाहून गेलेल्या डॉ. दीपक अमरापूर यांच्या मृत्यूप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. सिद्धेश अशोक बेलसेकर, राकेश जर्नादन कदम, निलेश जर्नादन कदम, दिनार रघुनाथ पवार अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांनाही 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या चौघांनी घरात पाणी शिरु नये आणि पाण्याचा निचरा व्हावा यासाठी परिसरातील चार मॅनहोल उघडे केले होते. याच मॅनहोलमध्ये पडून डॉ. अमरापूरकरांचा मृत्यू झाला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram