मुंबई : अल्पवयीन मुलाकडून 28 वर्षीय तरुणाची हत्या
Continues below advertisement
मुंबईच्या भांडूप भागात काल रात्री एका अल्पवयीन मुलाने एका युवकाची हत्या केली. भांडूप मधील टेंभी पाडा भागात काल रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचे भांडण सुरु असताना राजभर नावाच्या 28 वर्षाच्या युवकाने हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत दोन्ही मुलांना रागावले. हा राग मनात धरत, त्यातील एका अल्पवयीन मुलांने धारदार शस्त्राने राजभर नावाच्या युवकावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या या युवकाला जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आलं. मात्र, या युवकाला रुग्णलयात मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतलं असून जुवेनाइल जस्टिस ऍक्ट तहत अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement