मुंबई : 26/11 हल्ल्यात आई-वडिल गमावलेला बेबी मोशे मुंबईत दाखल

Continues below advertisement
26/11 हल्ल्यात आई-वडिलांचं छत्र हरवलेला चिमुकला मोशे आज मुंबईत आला आहे. नरिमन हाऊसला दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मोशे अगदी 2 वर्षांचा होता. आणि आता तो 11 वर्षांचा झाला. पंतप्रधान मोदी इस्रायल दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी मोशेची भेट घेतली होती आणि त्याला भारतात येणार का? असं विचारलं असता मोशेनंही मोठ्या उत्साहानं होकार दर्शवला होता. भारत सरकारतर्फे मोशे आणि त्याच्या कुटुंबियांना 10 वर्षांचा व्हिजा देण्यात आला, ज्यात मोशे कितीही वेळा भारतात येऊ शकतो. त्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान जेव्हा पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत आहेत तेव्हा त्यांनी मोशेलाही आपल्यासोबत भारतात आणलं. आणि मोशेही आपल्या आई-वडिलांच्या आठवणींमध्ये रमण्यासाठी आणि नरिमन हाऊसला भेट देण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती मिळते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram