मुंबई विमानतळाचा मुख्य रनवे सलग दुसऱ्या दिवशीही बंद

Continues below advertisement
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सलग दुसऱ्या दिवशी मेगाब्लॉक असणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीसाठी विमानतळावरचा मुख्य रनवे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे काही उड्डाणं रद्द होणार आहेत तर काहींची वेळ बदलण्यात आली आहे. परिणामी गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशांनी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून विमानसेवेच्या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, कालही सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत रनवे बंद होता. त्यामुळे या कार्यकाळात जवळपास 64 डोमेस्टिक आणि 6 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram