मुंबई : विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त
Continues below advertisement
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 15 किलो सोन्याची तस्करी करताना एका कोरियन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाने काल ही कारवाई केली. हाँगकाँवरुन मुंबईत येत असताना तपासणीदरम्यान या व्यक्तीच्या पांढऱ्या जॅकेटमध्ये सोन्याची बिस्कीटं आढळली. या सोन्याची बाजारातील किंमत तब्बल 4 कोटी 15 लाख रुपये आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सध्या या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे.
Continues below advertisement