मुंबई : राज्यात परतीच्या पावसाचा कहर, वीज पडून 11 जणांचा मृत्यू
महाराष्ट्राच्या अनेक भागात परतीच्या पावसाचा कहर पाहायला मिळाला. वीज पडून काल (शुकवार) दिवसभरात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. पालघरमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. धुळ्यात तीन महिला, जालन्यात एक आणि मुंबईत एकाचा वीज पडून बळी गेला.