मुंबईत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये म्हाडाची लॉटरी : प्रकाश मेहता
परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून असणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मुंबई मंडळाच्या म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी सोडत निघणार आहे. 900 ते एक हजार घरांसाठी ही लॉटरी असेल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली.