नाट्यसंमेलनाचं सूप वाजलं, उद्धव ठाकरेंची 'संपर्क फॉर समर्थन'वर टीका

Continues below advertisement
९८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं सूप वाजलं आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे, स्वागताध्यक्ष विनोद तावडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित होते. गिरगाव बिर्ला केंद्र इथं मराठी नाट्य संमेलनाचं समृद्ध दर्शन घडवणारं दालन महापालिकेतर्फे उभारण्यात येईल, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. नाट्य संमेलनाच्या मंचावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या संपर्क फॉर समर्थन अभियानाची खिल्ली उडवली. दरम्यान, यंदा प्रथमच सलग 60 तास नाट्यसंमेलन रंगलं. या नाट्यसंमेलनाला रसिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram