मुंबई : बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने 15 बँकांतून कर्ज काढत इसमाची लूट

आपल्याकडील कागदपत्रे बाहेर देताना काळची घ्या अन्य़था त्याचा मोठा गैरवापर होण्याची शक्यता आहे. कारण मुलुंडमध्ये राहणाऱ्या योगेश भाटिया यांची अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे. योगेश यांचे अकाउंट काही दिवसापूर्वी फ्रिज करण्यात आले होते. कारण त्यांच्या नावावर थोडी थोडकी नव्हे तर पंधरा विविध बँकेतून कर्ज काढण्यात आली होती. योगेश यांच्या नावाची खोटी कागदपत्र तयार करून कर्जावर काही महागडया दुचाकी. मोबाईल फोन तसेच विविध वस्तू खरेदी केल्या गेल्या आहेत. तसेच त्यांच्या नावे क्रेडिट कार्डही काढण्यात आलंय. यामागे एखादं रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola