पुणे | सुप्रिया सुळेंकडून सेल्फी विथ खड्डे मोहीम पुन्हा सुरू
सेल्फी विथ खड्डे ही मोहिम राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा सुरु केली आहे. मुळशी तालुक्यातील भुगाव येथील रस्त्याची दुर्दशा दाखवणारा सेल्फी पोस्ट करत सुळे यांनी खड्डे आंदोलनाचं दुसरं पर्व सुरु केलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना हा फोटो टॅग केला. तसेच नागरिकांनी रस्त्याची दुर्दशा दाखवणारे सेल्फी काढून चंद्रकांत पाटलांना ते टॅग करण्याचं आवाहन देखील केलं.