मुंबई : एसटीच्या ताफ्यात एक हजार नॉन एसी स्लीपर बस

खाजगी प्रवासी वाहतुकीला तोडीस तोड म्हणून एसटीमध्येही काही बदल होत आहेत. शिवनेरी, अश्वमेधनंतर शिवशाही बस त्याचाच एक भाग. आता प्रवाशांना रात्री लांब पल्ल्याचा प्रवास झोपून करता यावा यासाठी एसटी महामंडळ विनावातानुकूलित शयनयान बस आणत आहे. पुण्यातील मध्यवर्ती कार्यशाळेत विनावातानुकूलित शयनयान असलेल्या बसच्या (नॉन एसी स्लीपर कोच बस) निर्मितीचं काम सुरु आहे. येत्या वर्षभरात साधारण एक हजार विना वातानुकूलित शयनयान बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. टू बाय वन, 30 शयन कोच असणारी ही बस पुण्यातील सीआयआरटी या संस्थेकडून प्रमाणित करुन त्यानुसार बांधणी सुरु आहे. लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या विनावातानुकूलित शयनयान बससाठी एसटीचेच चालक, वाहक असतील, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola