मुंबई : खासगी वाहतूकदारांच्या भाडेवाढीला सरकारचं वेसण
सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी खासगी वाहनधारकांसाठी दर निश्चिती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामुळे खासगी वाहनांना आता गर्दीच्या हंगामात एसटीच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. तर अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द केला जाईल असं ही ते म्हणाले. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.