मुंबई : एमपीएससीचा अजब न्याय, गुण मिळवूनही मागासवर्गीय मुलींना नोकरी नाही!
Continues below advertisement
गेल्या चार वर्षात मागासवर्गीय मुली, ज्या खुल्या प्रवर्गातून एमपीएससीची परीक्षा देत आहेत, त्यांना नोकरी डावलण्याची अनेक प्रकरणं झाली आहेत. कारण, एमपीएससीने त्यांना त्यांची जात विचारली. त्यातील काही मुलींनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. पण शेतकऱ्यांच्या या मुली वकिलांना द्यावे लागणार पैसे नसल्यामुळे अजूनही नोकरीपासून वंचित आहेत. महिला आणि त्यात मागासवर्गीय म्हणून जास्त अन्याय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग करत असल्याची भावना या परीक्षार्थींमध्ये आहे.
Continues below advertisement