युनिसेफच्या वतीनं सुप्रिया सुळेंना पुरस्कार | मुंबई | एबीपी माझा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पार्लमेंटरियन अवॉर्ड फॉर चिल्ड्रन या पुरस्कारनं गौरवण्यात आलंय. युनिसेफ आणि पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन या संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आलाय.
राज्यभरातल्या अंगणवाड्या आणि शाळांमध्ये सुप्रिया सुळे सतत काम करतात. कर्णबधीर मुलं आणि जेष्ठांसाठी सुप्रिया सुळेंनी श्रवणयंत्र बसवण्याचा कार्यक्रम वेळोवेळी हाती घेतलाय. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झालीय. या सगळ्या कामाची युनिसेफनं दखल घेतली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola