लखनौ : ईदला तरुणीशी गळाभेट घेण्यासाठी मुरादाबादमध्ये तरुणांची रांग
Continues below advertisement
मिलो सब गले अब तो आई है ईद..असं म्हणत रमजान ईदनिमित्त जगभरातल्या मुस्लिम बांधवांनीच नाही तर सर्वांनीच एकमेकांना प्रेमानं आलिंगनं दिली असतील. मात्र, उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये एका मुलीचं हे प्रेम जरा अधिकच ऊतू गेलं. कारण, तीनं एक दोन नव्हे तर शेकडो मुस्लिम तरूणांना आलिंगन देऊन ईद-मिलन साजरं केलं. मुरादाबादमधल्या एका मॉलच्या बाहेर या मुली आणि तीच्या मैत्रिणीनं ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं. या मुलीनं तिथं उपस्थित असलेल्यांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, लवकरच ही बातमी पसरली आणि सोशल मीडियावरही व्हायरल झालीय मग काय विचारता.....तीचं प्रेमभराचं आलिंगन घेण्यासाठी आणि तिला देण्यासाठी तिथं तरूणांची रांगच लागली.
Continues below advertisement