नवी दिल्ली: मूडीजच्या मते भारतात 'अच्छे दिन', 13 वर्षांनी रेटिंगमध्ये वाढ
Continues below advertisement
अमेरिकेची रेटिंग एजन्सी मूडीजने तब्बल 13 वर्षांनी भारताचं रेटिंग वाढवलं आहे. 2004 नंतर पहिल्यांदाच मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग वाढवलं आहे.
मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग एका अंकाने वाढवलं आहे. आतापर्यंत भारताचा समावेश BAA-3 या श्रेणीत होता, आता तो BAA-2 श्रेणीत करण्यात आला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली भारताची पत वाढली आहे.
Continues below advertisement