Pune Monsoon | पुणे शहरात मान्सूनचं आगमन, अनेक भागात पावसाच्या सरी | पुणे | ABP Majha
आज दुपारनंतर पुणे शहरातील बहुतांश भागात पावासाला सुरुवात झाली. येत्या चार दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात बरसेल असा अंदाज पुणे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. तिकडे नाशिक शहरातील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली.