पुणे : मान्सून केरळमध्ये दाखल, 6 जूनपर्यंत मुंबईत धडकण्याची शक्यता
Continues below advertisement
ज्याची तुम्ही आम्ही चातकाप्रमाणं आतुरतेनं वाट पाहत होतो, तो मान्सूनराजा देशाच्या प्रवेशद्वारावर येऊन धडकला आहे. मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला. हवामान विभागानं याची अधिकृत घोषणा केली आहे. केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. इथल्या सगळ्या हवामान केंद्रांवर पावसाची नोंद करण्यात आली. मान्सूनचे सगळे निकष पडताळल्यानंतर हवामान विभागानं मान्सून आल्याचं जाहीर केलं.
Continues below advertisement