VIDEO | सरकारने पाठ फिरवली, भाजपची 'पोस्टर गर्ल' मोनिका मोरे मनसेच्या मंचावर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
मुंबईतील लोकल अपघातात हात गमावल्यानंतर भाजपची 'पोस्टर गर्ल' झालेली मोनिका मोरे मनसेच्या व्यासपीठावर आली. स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर राहिलेल्या मोनिकाने भाजपने आपल्याला दिलेलं नोकरीचं आश्वासन हवेतच विरल्याची खंत बोलून दाखवली. 'एबीपी माझा'शी मोनिकाने एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकलच्या अपघातात मोनिका मोरेने दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या पुढाकाराने तिला कृत्रिम हात बसवण्यात आले. मोनिका मोरे स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर झाली. खु्द्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोनिकाच्या नावाचं ट्वीट करत तिचं कौतुक केलं होतं. मात्र पदवी मिळाल्यानंतर आपल्याला नोकरी-घर देण्याचं आश्वासन देऊनही सत्ताधाऱ्यांनी ते पूर्ण केला नसल्याचा दावा मोनिकाने केला आहे.