मोहम्मद अली जिनांची मुलगी डीना वाडिया यांचं निधन
Continues below advertisement
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची मुलगी डीना वाडिया यांचं निधन झालं आहे. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 98 वर्षांच्या होत्या.
डीना वाडिया ह्या, मोहम्मद जिना आणि रतनबाई पेटिट यांच्या एकमेव अपत्य होत्या. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1919 रोजी झाला होता. वाडिया ग्रुपचे संचालक नुस्ली वाडिया यांच्या डीना वाडिया आई होत्या.
Continues below advertisement