धरमशाला विमानतळावर पडता पडता मोदी सावरले | हिमाचल प्रदेश | एबीपी माझा
पंतप्रधान मोदी आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. सव्वा बाराच्या सुमारास मोदी धरमशाला विमानतळावर दाखल केले. यावेळी सरकारच्या वतीनं मोदींचं स्वागत केलं जात होतं. मात्र, त्यावेळी मोदींचा पाय अडखळल्यानं त्यांचा तोल गेला... तोच सुरक्षारक्षकांनी त्यांना सावरलं. त्यामुळे मोदीजी धरमशाला विमानतळावर पडता पडता सावरले आणि पुढे कार्यक्रमासाठी रवाना झाले. हिमाचल प्रदेश सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं मोदी राज्याच्या दौऱ्यावर आहेत.