पुणे : महिन्याला 99 रुपये, चीनची मोबाईक सायकल शेअरिंग कंपनी भारतात
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईक या चीनच्या सायकल शेअरिंग कंपनीचं भारतात आगमन झालंय. जगभरातील दोनशे शहरांमध्ये व्यवसाय करणाऱ्या या कंपनीने पुण्यातून सायकल शेअरिंग सर्विसचा शुभारंभ केलाय. या कंपनीने पुण्यात विविध ठिकाणी 500 सायकल लोकांना उपलब्ध करून दिल्यात. 99 रुपयांमध्ये ही सायकल महिनाभर पाहिजे तितका वेळ वापरता येणार आहे.