रायगड : बेरोजगार स्थानिकांनी नोकरी, कामधंद्यासाठी मुंबईला यावं : राज ठाकरे

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोकणातील बेरोजगार तरुणांना मुंबईला येण्याचा सल्ला दिला. शिवाय राज्यातील किनारपट्टीवर सुरु असलेल्या एलईडी मासेमारीला मच्छीमारांचा विरोध असून यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेईल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. काल राज ठाकरेंनी रोहा, म्हसळा आणि श्रीवर्धनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आज ते रायगडमधील महाड, पोलादपूर, माणगाव, पेण तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांचा भेट घेतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram