MNS on Hirkani | 'हिरकणी'ला थिएटर न दिल्यास मनसेकडून 'खळखट्याक'चा इशारा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Oct 2019 09:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा मराठी चित्रपट 24 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट 'हाऊसफुल 4' हा 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'हाऊसफुल 4' मुळे हिरकणी चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे 'हिरकणी' या मराठी चित्रपटाला चित्रपटगृह दिले नाहीत तर काचा फुटणार, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला आहे. मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळावे, यासाठी मनसे चित्रपट सेना पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. 'हिरकणी'साठी मनसेच्या चित्रपट सेनेने चित्रपटगृह मालकांना खळखट्याकचा इशारा दिला आहे.