जळगाव : मनसेला खिंडार, मनसेचे सर्व 12 नगरसेवक सुरेश जैन गटात

Continues below advertisement
महापालिका निवडणुकीच्या अगोदर जळगावात राज ठाकरे यांच्या मनसेला मोठी खिंडार पडली आहे. सर्वच्या सर्व 12 नगरसेवक सुरेश जैन यांच्या गटात सहभागी झाले आहेत.

मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान महापौर ललित कोल्हे यांनी ही माहिती दिली.

सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने भाजपसोबत युतीचे संकेत दिले आहेत. युती न झाल्यास स्वबळावर लढण्याचीही तयारी खान्देश विकास आघाडीने केली असल्याची माहिती सुरेश जैन यांनी दिली.

दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी करुन निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram